हैदराबाद : बेंगळुरू राप्टर संघाने प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) अंतिम सामन्यात विजय मिळवून सलग दुस-यांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. बेंगळुरू राप्टर संघाने रविवारी झालेल्या लढतीत नाॅर्थ ईस्टर्न वाॅरियर्स संघाचा ४-२ असा पराभव केला.
Cometh the hour, cometh the champions! 👏🏻@blr_raptors #RiseOfTheRacquet #PBL5Final #NEvBLR #PBLSeason5 pic.twitter.com/lc2nMWwAaH
— Premier Badminton League (@PBLIndiaLive) February 9, 2020
बेंगळुरूच्या बी. साईप्रणीतने पुरूष एकेरीतील पहिल्या लढतीत चेक यिऊला १४-१५, १५-९, १५-३ असे पराभूत केले. पुरूष दुहेरीत बोदिन इसारा आणि ली याँग यांनी अरूण जाॅर्ज-रियान सुपत्रो या जोडीवर १५-११, १३-१५, १५-१४ असा विजय मिळविला. ट्रम्प लढतीत वाॅरियर्सने २ गुण मिळवले.
.@eomhyewon1 & Chan Peng Soon seal the deal for @blr_raptors as they register win the final game of #PBLSeason5 in straight sets!#RiseOfTheRacquet #PBL5Final #NEvBLR pic.twitter.com/K5Cjbic90B
— Premier Badminton League (@PBLIndiaLive) February 9, 2020
महिला एकेरीत ताई झू यिंगने मिशेल ली हिला १५-९, १५-१२ असे पराभूत करत बेंगळुरूला २-२ अशी बरोबरी मिळवून दिली. ट्रम्प सामन्यात चॅन सून आणि ईआॅन वाॅन यांनी कृष्णाप्रसाद आणि किम हा ना यांना १५-१४, १४-१५, १५-१२ असे पराभूत करत बेंगळुरूला विजेतेपद मिळवून दिले.