व्हिडीओ : मक्क्याचे कणीस विकणारी 75 वर्षीय वृध्द महिला आणि सोलरफॅन

बेंगलुरू- तंत्रज्ञानाच्या मदतीने अवघड काम करणे आता सोप्पे झाले आहे. जे काम करण्यासाठी खूप सारा वेळ आणि खूप मेहनत लागत होती, ते काम आता कोणत्याही त्रासाविना सहजरित्या केले जाऊ शकते. मग ते काम छोटे असो किंवा मोठे. अशीच एक बातमी समोर येत आहे कर्नाटकची राजधानी बेंगलुरू येथून.

बेंगलुरू येथे एक 75 वर्षाची वयोवृध्द आजी (सेलवम्मा) एका रस्त्याच्या बाजूला भाजलेले मक्क्याचे कणीस विकण्याचे काम करत आहे, ती आता कणीस भाजण्यासाठी सोलर फॅनचा वापर करीत आहे. याठिकाणी मक्क्याचे कणीस भाजण्यासाठी सोलर फॅनचा वापर होण्यामागची एक मनोरंजक गोष्ट आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान हा सोलर फॅन त्याठिकाणी लावला गेल्याने 75 वर्षीय वृध्द आजी आता खूपच खूश आहे. आता तिला मक्क्याचे कणीस भाजण्यासाठी हाताने हवा घालावी लागत नाही. त्यामुळे तिच्या हाताचे दुखणे देखील कमी झाले आहे. मक्याचे कणीस विकणाऱ्या आजीने स्वत:च्या पैशातून हा सोलर फॅन लावला नाही तर तिला एका कंपनीने हा भेटस्वरूपात दिला आहे.

दरम्यान सेल्को कंपनीचा (सौर ऊर्जा क्षेत्रात काम करणारी कंपनी) एक कर्मचारी रोज संबंधित रस्त्यावर कामासाठी ये-जा करत असत.

तो कर्मचारी रोज त्या वृध्द आजीला आपल्या हातातील पख्यांने हवा घालून मक्क्याचे कणीस भाजताना पाहत असत. त्याने यासंबंधीची चर्चा त्यांच्या कंपनीत केली. त्यानंतर यासंबंधी कंपनीत मिटिंग झाली की त्या वृध्द महिलेस कशाप्रकारे मदत करता येईल ?

मिटिंगदरम्यान  तिच्या मक्क्याचे कणीस विकण्याच्या गाडीवर सोलर फॅन इंस्टाॅल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर त्याठिकाणी सेल्को कंपनी कडून अभियंते आले आणि त्यांनी सोलर फॅन आणि त्याचा आकार निश्चित करण्यासाठी मोजमापं केली आणि त्यानुसार मक्क्याचे कणीस विकणाऱ्या विक्रेत्यासाठी एक स्पेशल सोलर फॅन तयार केला आणि हा फॅन त्या वृध्द महिलेस भेटस्वरूपात दिला.

या सोलर फॅनचे वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये रात्रीच्या वेळेसाठी एक बल्ब आहे आणि रात्री जेव्हा सूर्यप्रकाश नसल्याने बॅटरी चार्ज होत नाही, तेव्हा देखील हा सोलर सिस्टीम फॅन सलग चार तास पंखा आणि लाईटसोबत चालू शकतो.

व्हिडीओ पहा……..??

मक्क्याचे कणीस विकणारी 75 वर्षीय वृध्द महिला आणि सोलरफॅन

बेंगलुरू येथे एक 75 वर्षाची वयोवृध्द आजी (सेलवम्मा) एका रस्त्याच्या बाजूला भाजलेले मक्क्याचे कणीस विकण्याचे काम करत आहे, ती आता कणीस भाजण्यासाठी सोलर फॅनचा वापर करीत आहे. याठिकाणी मक्क्याचे कणीस भाजण्यासाठी सोलर फॅनचा वापर होण्यामागची एक मनोरंजक गोष्ट आहे…. सविस्तर वाचा … https://goo.gl/eu7ZTh

Posted by Dainik Prabhat on Monday, 28 January 2019

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)