#AFCCup2020 : ‘बेंगळुरू एफसी’ संघाचा ‘पारो एफसी’वर ९-१ ने मोठा विजय

नवी दिल्ली : सेमबोई हाओकिप आणि डेशोर्न ब्राउन यांच्या हटट्रिकच्या जोरावर इंडियन सुपर लीग चॅम्पियन बेंगळुरू एफसी संघाने एएफसी कप स्पर्धेत भूटानच्या पारो एफसी क्लब संघास दुस-या फेरीतील सामन्यात ९-१ ने पराभूत करत पात्रता स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला.

पहिल्या फेरीतील सामन्यात बेंगळुरूने १-० ने विजय मिळविला होता. त्यानंतर दुस-या फेरीत मोठा विजय नोंदविला.

बेंगळुरूकडून हाओकिपने ६ व्या, २६ व्या, ६७ व्या आणि ८५ व्या मिनिटाला गोल केले. तर, जमैकाच्या ब्राउनने २९ व्या, ५४ व्या आणि ६४ व्या मिनिटाला गोल केले. दोन अन्य गोल जुआनन गोंजालेसने १४ व्या मिनिटाला आणि निली परडोमोने ७९ व्या मिनिटाला गोल केले.

पारो एफसी संघाकडून एकमेव गोल चेंचो गेल्टशेन याने १६ व्या मिनिटाला केला.

Leave A Reply

Your email address will not be published.