बंगळुरू बुल्स विरूध्द हरयाणा स्टीलर्स
स्थळ-अहमदाबाद
वेळ- रात्री 7-30 वा.
अहमदाबाद – प्रो कबड्डी लीगमध्ये आज पहिल्या सामन्यात बंगळुरू बुल्ससमोर हरयाणा स्टीलर्सचे आव्हान असणार आहे. स्पर्धेतील आतापर्यतंची कामगिरी पाहता हरयाणा स्टीलर्सविरुद्ध बंगळुरू बुल्सची बाजू वरचढ मानली जात आहे, त्यामुळे हरयाणा स्टीलर्स संघाला त्यांच्याविरूध्द विजय मिळविणे कठीण जाणार आहे.
बंगळुरू संघाने आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत. त्यांनी चढाया व पकडीमध्ये समाधानकारक खेळ केला आहे. त्यांचे खेळाडू पल्लेदार चढाया करण्यात माहीर आहेत. हरयाणा संघाकडे अनपेक्षित कामगिरी करण्याची क्षमता आहे.
बंगळुरू बुल्स :
बलस्थाने – सातत्यपूर्ण कामगिरी, उत्कृष्ट सांघिक कौशल्य.
कच्चे दुवे – शेवटच्या क्षणी नियंत्रणाचा अभाव.
हरयाणा स्टीलर्स :
बलस्थाने – ताकदवान खेळावर भर, भक्कम पकडी करण्यात माहीर.
कच्चे दुवे – खेळावर नियंत्रणाचा अभाव.