नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर काल नंदीग्राममध्ये अज्ञातांनी हल्ला केला असल्याचा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. निवडणूक प्रचारादरम्यान बुधवारी ४-५ जणांनी आपल्याला धक्काबुक्की करून ढकलल्यामुळे आपल्या पायाला जखम झाली, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला.
या या हल्ल्यावर अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उर्मिला मातोंडकर यांनी ट्विट करत तंदुरुस्त होऊन पुन्हा एकदा मैदानात उतरा असा सल्ला दिला आहे.
“What doesn’t break you,makes you stronger” and we certainly know it for sure in this case as rarely has one seen such strength n vigour. Wishing the Bengal Tigress @MamataOfficial ji a speedy recovery 🙏 #WomanOfCourage pic.twitter.com/x8cvQl2WOO
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) March 11, 2021
काय म्हणाल्या उर्मिला मातोंडकर
‘जी गोष्ट तुम्हाला तोडू शकत नाही ती तुम्हाला आणखी मजबूत करते. अशी ताकत आम्ही यापूर्वी पाहिलेली नाही. बंगालची वाघिण लवकरात लवकर तंदुरुस्त होईल. ममतादीदी तुम्ही पुन्हा मैदानात कधी उतराल याची आम्ही वाट पाहात आहोत.” असं ट्विट करत उर्मिला मातोंडकर यांनी ममता बॅनर्जी यांचा रुग्णालयातील एक फोटो पोस्ट करुन त्यांच्याबाबत काळजी व्यक्त केली आहे.