Famous Actor Death : मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंगाली चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जी यांचे निधन झाले आहे. दिघा येथे मालिकेच्या शूटिंगदरम्यान समुद्रात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल बॅनर्जी हे सध्या भोले बाबा पार करेगा या मालिकेत मुख्य भूमिकेत काम करत होते. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी संपूर्ण युनिट दिघाजवळील तळसारी किनाऱ्यावर दाखल झाले होते. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर राहुल समुद्रात पोहण्यासाठी गेले. मात्र अचानक आलेल्या जोरदार लाटांमध्ये ते अडकले आणि बुडू लागले. Famous Actor Death घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ धाव घेत त्यांना पाण्यातून बाहेर काढले. त्या वेळी ते शुद्धीवर होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. Famous Actor Death : मनोरंजन विश्व हादरले..! प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; शूटिंगदरम्यान घडली मोठी दुर्घटना दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार बुडणे हे कारण असू शकते, मात्र हृदयविकाराचा झटका आला होता का याबाबतही तपास सुरू आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्टता येणार आहे.Famous Actor Death राहुल अरुणोदय बॅनर्जी हे टॉलीवूडमधील एक लोकप्रिय आणि बहुगुणी कलाकार होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक नाटकं, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. चिर्दिनी तुम्ही जे आमार या चित्रपटातून त्यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.Famous Actor Death