अहमदाबाद – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दोन दिवसांचा भारत दौऱ्यासाठी आले आहेत. त्यांच्या या दौऱ्याचा भारताला चांगलाच फायदा होणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमातील भाषणात सांगितलं.
या दौऱ्यामुळे भारत- अमेरीका या दोन देशांतील संबंधांमधील विश्वास वाढेल. व्यापार, संरक्षण, संशोधन, सांस्कृतिक संबंध अशा सगळ्याच क्षेत्रात भारत सरसावेल, असंही मोदी म्हणाले
दरम्यान, या दौऱ्याचा फायदा फक्त भारतालाच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांना आगामी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकांसाठीही होणार असल्याचं सांगितलं जातं आहे.