सुखाची झोप मोलाचीच ( भाग 3)

डाॅ. वैशाली माने

आयुर्वेदाने आपल्या आयुष्याचे तीन आधारस्तंभ सांगितले आहेत. 1) आहार, 2) निद्रा, 3) ब्रह्मचर्य.
या तीन आधारस्तंभांपैकी एक निद्रा म्हणजेच झोप याची आज माहिती घेऊया.

सध्याच्या स्पर्धात्मक जगात प्रत्येकालाचं प्रचंड ताणाला सामोरं जावं लागतं. या ताणाची लक्षणं प्रत्येकामध्ये वेगवेगळी असली तरी बहुतांश जणांना निद्रानाशाचा त्रास सहन करावा लागतो. अशा या निद्रानाशाची लक्षणं, कारणं काय असतात? आणि त्यावर उपाय काय?याची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून घेऊयात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निद्रानाशाची कारणं

-नोकरीच्या ठिकाणचा ताण
-लहान मुलं
-आजूबाजूला सतत गोंगाट
-घोरण्याचा आवाज
-शारीरिक त्रास
-इंटरनेटचा अतिवापर
-खूप जास्त खाणं
-कामाच्या अयोग्य वेळा
-जेटलॅग
-व्यसन

व्यवस्थित झोप लागण्यासाठी व्यायाम

योग्य आणि पूरक असा व्यायाम केल्यास झोप लागण्यास मदत होईल. ताण हलका होण्यासाठी व्यायाम हा उत्तम पर्याय आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे झोपण्यापूर्वी व्यायाम करणं कटाक्षाने टाळावं.

व्यवस्थित झोप लागण्यासाठी विश्रांती

झोपण्यापूर्वी प्राणायाम करावं. झोपण्याच्या एक तास आधी इंटरनेटच्या संपर्कात जाऊ नये. तसंच ताण देणाऱ्या गोष्टी किंवा काम करणंही टाळावं.

व्यवस्थित झोप लागण्यासाठी आहार

पोटभरून जेवण्यापेक्षा एक घास कमीच खावा, असं म्हणतात ते खरंच आहे. तसंच रात्री काहीच न खाणं, ही सवयदेखील टाळावी. कारण भूकेमुळे झोप लागण्यास अडथळे येऊ शकतात.

चहा किंवा कॉफी पिणं टाळा

झोपण्यापूर्वी कॉफी किंवा चहा पिणं टाळावंच. त्याशिवाय केक, चॉकलेटसारखे गोडपदार्थही खाऊ नयेत.

किती झोप आवश्‍यक आहे?

संशोधक आणि तज्ज्ञ मंडळीनुसार, दिवसातून किमान सात ते नऊ तास झोप घेणं आवश्‍यक आहे. तुम्ही किती झोपता यावर तुमची चयापचयाची क्रिया अवलंबून असते.

काय करा?

पलंगावर झोपण्याशिवाय इतर कोणतंच काम करू नका. लॅपटॉप किंवा इतर कोणत्याही उपकरणाला तुमच्या बेडरूममध्ये जागा देऊ नका. खोलीचे रंग हे नेहमी फिके असावेत. जेणेकरून लवकर झोप लागण्यास मदत होईल. तसंच कोणत्याही विचित्र आकाराचे पेंटिग्स किंवा चित्र तुमच्या खोलीमध्ये नसावं.

सुखाची झोप मोलाचीच ( भाग 1)              सुखाची झोप मोलाचीच ( भाग 2)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)