उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडी असतेच पण दुसरा ऑपशन म्हणजे वरईचे तांदूळ किंवा भगर. भगरीची खीर, खिचडी, भाकरी असे वेगवेगळे पदार्थ केले जातात.
1.वरई , भगरमध्ये फायबर आणि मिनरल्स भरपूर असतात. जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते.
2. वरई , भगरीमध्ये सोडियम कमी असते, ज्याने शरीराचे ब्लड सर्क्यलेशन नॉरमल ठेवण्यास मदत करते.
3. वरई , भगरीच्या तांदळात 30 टक्के जास्त एँटीऑक्सिडेट तत्व असतात. जे त्वचा, केस यांचे आरोग्य राखण्यास मदत करते.
4.वरई , भगरमध्ये व्हिटॅमिन बी-3 असते. पॅलेग्राच्या रुग्णांना भगर खाण्यात घ्यावी.
5.वरई मध्ये कॅल्शिअम फार प्रमाणात असल्याने हाडांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते. लहान मुलांना व वृध्दांना खाण्यात द्यावे.
6.वरई , भगरमध्ये मॅग्नेशियम असल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवते.
7. वरई , भगर ग्युटन फ्री आहे. ज्यांना ग्युटन ऍलर्जी आहे. त्यांनी आहारात भगर घ्यावे.
8.वरई , वजन कमी करायचे असल्यास भरपूर खावे. फायबर भगरमध्ये असते.
9. वरई , थाइरॉईड असल्यास भगर खाणे टाळावे.
10.वरई , भगरीमध्ये प्रोटिन असल्याने भगर खाल्ल्याने शरीर हलके व एनर्जीटीक राहते.
11.वरई , भगरी मध्ये 100ग्रॅम ते 171ग्रॅम कॅलरीज, 1ग्रॅम फॅट, 36ग्रॅम कार्ब्स, 3ग्रॅम प्रोटीन असतात.
डॉ. आदिती पानसंबळ आहारतज्ज्ञ, नगर.