भरपूर पौष्टिक ‘मखाना’ दररोज खा ना! गंभीर आजार होतील नाहीसे, जाणून घ्या चमत्कारी फायदे

Best Food – मखाना म्हणजे कमळाच्या बिया. सर्वत्र सहज उपलब्ध असणारा हा पदार्थ उत्तम गुणांनी परिपूर्ण आहे. मखानासारख्या सुक्या मेव्याचे गुणधर्म आणि त्याचे फायदे ऐकल्यावर आपण दररोजच्या आहारात त्याचा समावेश नक्की कराल. फक्त आपणांस त्याच्या सेवनाची योग्य माहिती असायला हवी. तत्पूर्वी मखानाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

मखानाला भारतातील बर्‍याच भागात लावा असेही म्हणतात. दलदलीच्या प्रदेशातील शांत पाण्यामध्ये, तलावात वाढणारा मखाना हे पोषक तत्वांनी समृद्ध आहे. मखान्याचे बीज भाजून त्याचा उपयोग मिठाई, नमकीन, खीर इत्यादीसाठी केला जातो.

मखानामध्ये 9.7 % सहज पचणारी प्रथिने, 76% कार्बोहायड्रेट, 12.8% आर्द्रता, 0.1 % चरबी, 0.5 % खनिज ग्लायकोकॉलेट, 0.9% फॉस्फरस आणि प्रति 100 ग्रॅम 1.4 मिलिग्राम लोह असते. यात औषधी गुणधर्म देखील आहेत. बिहारमधील मिथिला, दरभंगा, मधुबनी, समस्तीपूर, सहरसा, सुपौल, सीतामढी, पूर्णिया, कटिहार इत्यादी जिल्ह्यात माखनाचे उत्पादन होते. मखानाच्या एकूण उत्पादनापैकी 88 % उत्पादन बिहारमध्ये होते.

मखाना खाण्याचे फायदे- 

  • त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठीदेखील मखाना उपयुक्त आहे. त्यामधील अ‍ॅन्टी एजिंग एन्झाईम्स त्वचेला अधिक सतेज बनवते.

  • मखाना ग्लुटेन फ्री आहे. त्यामुळे बाजरी, ज्वारी आणि सोयाबीनच्या पीठासोबत मखाणाचे पीठ मिसळून केलेली भाकरीदेखील अत्यंत पोषक पर्याय आहे.

  • नॅचरल फ्लॅवोनॉईड्स मखान्यात असल्याने शरीरात दाह कमी करण्यास मदत होते.

विविध विकारात उपयुक्त –

मखान्यात मॅग्नेशियम मुबलक आणि सोडीयम कमी प्रमाणात असल्याने रक्तदाबामध्ये होणारा चढ उतार नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी, लठ्ठपणा कमी करण्यासाठी तसेच हृदयविकाराचा धोका आटोक्यात ठेवण्यासाठी मदत होते.

1 मधुमेह – दररोज 4 नग मखाने खाल्ल्यास आपला मधुमेहाचा आजार कमी होऊ शकतो. याच्या नियमित सेवनाने शरीरात इन्सुलिन बनण्याची प्रक्रिया होते. त्यामुळे शरीरात साखरेचे प्रमाण कमी होऊ लागते आणि मधुमेहासारखा आजार नाहीसा होतो.

2 हृदयरोग – मखान्याचा प्रभाव फक्त मधुमेहाच्या रुग्णांसाठीच फायदेशीर नव्हे तर हृदयविकाराच्या गंभीर आजारांमध्येही फायदेशीर आहे. त्याचे नियमित सेवन केल्याने हृदय निरोगी राहते आणि पचन सुरळीत होते.

3 अनिद्रा, तणाव – ज्यांना तणाव होऊन अनिद्राचा त्रास उद्भवतो त्यांच्यासाठी मखान्याचे सेवन करणे लाभकारी असते. दररोज झोपण्याआधी दुधाबरोबर मखाने घ्यावे. अनिद्रा आणि तणावाचा त्रास कमी होतो.

4 सांधेदुखी – मखान्यात कॅल्शियम भरपूर असते. त्यांचा नियमित सेवनाने सांधेदुखी, संधिवात सारखे आजार असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.

5 अपचन – मखान्यात अँटी ऑक्सीडेन्ट भरपूर प्रमाणात असतात ज्याला सर्व वयोगटातील लोकं सहज पचवू शकतात. या शिवाय ह्यात एस्ट्रोजनचे गुणधर्म देखील असतात. अतिसारासारख्या त्रासापासून मुक्त होऊन भूक वाढविण्यास सहाय्यक होते.

6 मूत्रपिंडाचे विकार – मखान्याच्या फुलात गोडपणा कमी असल्याने प्लीहा निर्विष (डिटॉक्सिफाइड) करण्याचे कार्य करते. मूत्रपिंड बळकट करण्यासाठी आणि रक्ताची शुद्धी करण्यासाठी नियमितपणे याचे सेवन करायलाच हवे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.