काकडी एक असा खाद्य पदार्थ आहे, जो सगळीकडे सहज मिळतो. काकडी शरीराला शीतलता आणि ताजेपणा प्रदान करते. काकडी तुम्ही अनेक प्रकारे खाऊ शकता. जसे सलाड, सॅडवीच किंवा तिखट मीठ लावून खाऊ शकता. काकडीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम, लोह, झिंक, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅगनीज असतात. काकडीमध्ये अँटी ऑक्साइट्सही आढळतात.
जे अनेक आजारांपासून तुमचं संरक्षण करतात. काकडीमधील कमी कॅलरीजमुळे याचा डाएटमध्ये ही भरपूर प्रमाणात वापर केला जातो. काकडीमध्ये पाण्याची मात्रा आणि सॉल्युबल फायबर अधिक असल्याने वजन कमी करण्यात ही काकडी उपयोगी ठरते.
1. काकडीमध्ये रक्तातील साखरेचा स्तर कमी करणं आणि मधुमेहातील काही कॉम्प्लिकेशन्स रोखण्यात मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांनी काकडीच साल नक्कीच खावी.
2. जर पोटाच्या समस्या किंवा कन्स्टीपॅशनची समस्या असेल तर तुम्ही रोजच्या आहारात काकडीचा समावेश केलाच पाहिजे.
3. जर तुम्हाला तोंडाच्या दूर्गंधीची समस्या असेल, तर तोंडात एक काकडीचा तुकडा धरून ठेवा. काकडीच्या वासाने तोंडात दूर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियापासून तुमची सुटका होईल.
4. काकडीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन “बी’ असतं. ज्यामध्ये व्हिटॅमिन “बी-1′, व्हिटॅमिन-“बी-5′ व्हिटॅमिन “बी-7′ यांचा समावेश आहे.
5. काकडीच्या वापराने डोळ्याखालील काळी वर्तुळ लवकर कमी करता येतात. तसंच डोळ्यातील उष्णता शोषली जाते व डोळ्यांना थंडावा मिळतो.
6. झोपून उठल्यावर डोळे सुजलेले असल्यास त्यावर काकडीच्या स्लाईस ठेवा किंवा काकडीचा रस लावा.
7. काकडीचा कीस चेहऱ्यावर लावल्याने चेहरा आणि त्वचा चमकदार बनते. चेहऱ्यावरचे डाग दूर होतात.
डॉ. आदिती पानसंबळ ,
आहारतज्ज्ञ, नगर. संपर्क : 7385728886