१. डार्क चॉकलेट वाढलेले वजन कमी करायला मदत करू शकते. जेवणाआधी आणि जेवणानंतर २० मिनीटांच्या अंतराने डार्क चॉकलेट खाल्यास भूक जवळपास ५०% ने कमी होते. चॉकलेट खाल्याने पचनाची प्रक्रिया संथ गतीने होते त्यामुळे पुढच्या जेवणापर्यंत पोट भरल्याची भावना टिकून रहाते. जास्त चॉकोलेट्स खाणार्या मुलांचा व प्रौढ व्यक्तींचा बॉडी मास इंडेक्स कमी असतो असेही दिसून आले आहे. वाढलेल्या वजनासाठी ही तर मेजवानीच समजायला हवी!
२. डार्क चॉकलेट: अॅन्टीऑक्सिडन्ट्सचा उत्तम स्त्रोत. आधी उल्लेख केल्याप्रमाणे डार्क चॉकलेटमध्ये शरीराला उपयुक्त असे भरपूर अॅन्टीऑक्सिडन्ट्स असतात – अगदी अनेक फळांपेक्षाही जास्त. या अॅन्टीऑक्सिडन्ट्समुळे शरीरातील पेशी नाश पावण्याचा वेग कमी होतो आणि शरीरास फायदा होतो.
३. डार्क चॉकलेट पोषक आहे. डार्क चॉकलेट तंतूमय पदार्थ आणि खनिजद्रव्यांनी समृद्ध आहे. त्यात लोह, कॉपर, मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉस्फरस, झिंक आणि सेलेनियम यांचे प्रमाण भरपूर आहे. पण डार्क चॉकलेट खाताना हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की त्यात स्निग्ध पदार्थ आणि कॅलरीजचे प्रमाण देखील भरपूर आहे. त्यामुळे ते खाताना त्याच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे. डार्क चॉकलेटमधील स्निग्ध पदार्थ तितकेसे वाईट नसतात. त्यात मोनो-अनसॅच्युरेटेड प्रकारचे स्निग्ध पदार्थ जास्त असतात तर पॉली-अनसॅच्युरेटेड प्रकारचे कमी.
४. डार्क चॉकलेट तुमचा रक्तप्रवाह आणि रक्ताभिसरण सुधारू शकते. डार्क चॉकलेटमध्ये फ्लेवोनॉईड्स असतात. त्यांच्यामुळे रक्तातील प्लेटलेट्स एकमेकाला चिटकत नाहीत आणि रक्ताची गुठळी तयार न झाल्याने हृदयविकार व अर्धांगवायूचा प्रतिबंध होतो. याहीपुढे जाऊन चॉकलेटमुळे नायट्रिक आम्ल स्त्रवले जाते व रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. यामुळे रक्तदाब कमी होतो आणि हृदयाची कार्यक्षमता वाढते. चॉकलेटमधील पॉलिफिनॉल्स आणि थिओब्रोमिनमुळे LDL म्हणजे वाईट प्रकारचे कोलेस्टेरॉल कमी व्हायला मदत होते तर HDL म्हणजे चांगल्या प्रकारचे कोलेस्टेरॉल वाढते. यामुळे हृदयाला संरक्षण मिळते.
५. डार्क चॉकलेट त्वचेसाठी चांगले असते. डार्क चॉकलेटमधील फ्लेवोनॉल्स्मुळे त्वचा चांगली दिसते. त्यातील अॅन्टीऑक्सिडन्ट्स त्वचेला UV किरणांपासून वाचवतात, त्वचेचा रक्तपुरवठा सुधारून त्वचेला तकाकी देतात, सुरकुत्या कमी करतात. फ्लेवोनॉल्स्मुळे त्वचेतील पाण्याचे प्रमाण आणि त्वचेची जाडी योग्य प्रमाणात रहाते. थोडक्यात डार्क चॉकलेट तुम्हाला सुंदर बनवते.
६. डार्क चॉकलेट तुम्हाला हुशार बनवू शकते! संशोधनात असे दिसले आहे की डार्क चॉकलेटमुळे मेंदूचा रक्तपुरवठा वाढतो आणि त्यामुळे स्मरणशक्ती वाढते, प्रतिक्रियेचा वेळ कमी होतो, एखादी अड्चण सोडवण्याची क्षमता वाढते. पुढच्या वेळी परीक्षा देताना फक्त शुभेच्छा म्हणूनच नाही, तर मेंदूला चालना देण्यासाठीही डार्क चॉकोलेट्सचा वापर करा! डार्क चॉकलेट मेंदूची क्षमता टिकवून ठेवते आणि पार्किन्सन्स, अल्झायमर्स यासारख्या आजारांपासून वाचवते.
७. डार्क चॉकलेटचे सूज-विरोधी परिणाम: डार्क चॉकलेट शरीरातील सूज आणि दाह कमी करते. ते संधिवाताच्या रुग्णांसाठीही लाभदायक असते.