जनता कर्फ्यू, सर्वेक्षणाचा बारामतीकरांना लाभ

836 ऍक्टिव्ह : 408 जणांना सौम्य लक्षणे

बारामती (प्रतिनिधी )- बारामती शहर व तालुक्यात लागू करण्यात आलेल्या जनता कर्फ्यू व माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्वेक्षणाचा फायदा बारामतीकरांना झालेला दिसून येत आहे. गेले सात दिवसात कोरोनाचा आलेख कमी होताना दिसून येत आहे. ही बाब बारामतीकरांसाठी दिलासादायक आहे. बारामतीत सध्या दि (27 )रोजी 836 रुग्ण ॲक्टिव्ह असून त्यापैकी 408 रुग्ण घरी उपचार घेत आहेत.

बारामती शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर शहरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला. 14 दिवसांच्या बारामती बंधने कोरोना ची साखळी तूटण्यास मदत झाली. माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्वेक्षणात कोरोना संक्रमित रुग्णांचे विलगीकरण करण्यात आले. त्यामुळे पुढील संसर्ग टळला. याचे परिणाम लॉकडाऊन हटविल्यानंतर दिसून आले.

गेले सात दिवस बारामतीतील पूर्ण संक्रमीत रुग्णांची संख्या दिवसंदिवस काही अंशी कमी होताना दिसून येत आहे. आज दि (27) रोजीच्या आकडेवारीनुसार एकूण रुग्णांच्या 70.36 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. बारामतीतील एकूण रुग्ण संख्या 3 हजार 71 एवढी झाली असून 2 हजार 161 रुग्ण आत्तापर्यंत बरे झाले आहेत . सध्य परिस्थितीत 836 रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी 408 रुग्ण घरी उपचार घेत आहेत. शासकीय रुग्णालय तसेच कोविड सेंटरमध्ये 182 रुग्ण आहेत. 46 रुग्ण ऑक्सिजन’वर 10 रुग्ण वेंटीलेटर वर आहेत.

जनता कर्फ्यू तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्वेक्षणामुळे कोरोनाची साखळी तुटन्यास मदत झाली आहे. त्यामुळे मागील आठवड्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. इथून पुढील काळात देखील नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. शासकीय नियमांचे काटेकोर पालन केल्यास परिस्थिती अजूनही दिलासादायक असेल.
– डॉ.मनोज खोमणे, तालुका वैद्यकीय अधिकारी.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.