मॅंचेस्टर – करोनानंतर सुरू झालेल्या क्रिकेटमध्ये आधी वेस्ट इंडिज व आता पाकिस्तानविरुद्धच्या विजयात मोलाची कामगिरी केलेल्या इंग्लंडच्या अष्टपैलू बेन स्टोक्स याने पाकिस्तानविरुद्धच्या उर्वरित मालिकेतून माघार घेतली आहे.
वेस्ट इंडिजला घरच्या मैदानावर 2-1 असे इंग्लंडने पराभूत केले. त्यात स्टोक्सच्या अष्टपैलू खेळाचा मोठा वाटा होता. पाकविरुद्धच्या पहिल्या कसोटीतही चमकदार कामगिरी करत संघाचा विजय साकार केला. स्टोक्सचे कुटुंबीय न्यूझीलंडमध्ये आहेत. त्यांना भेटायला जाण्यासाठी त्याने उर्वरित दोन कसोटींतून माघार घेतली आहे. इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने त्याला परवानगी दिली आहे.