पुणे – पत्नीला शारीरिक आणि मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणात पतीला सत्र न्यायाधीश एम.एम.देशपांडे यांनी 30 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला आहे. घटना झाल्यानंतर 12 दिवस विलंबाने एफआयआर दाखल आणि कोविड 19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे जामीन देण्यात येत असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
अमोल रतन मोहिते (वय 34 रा. गणेश पेठ ) असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. पुष्कर दुर्गे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. त्याच्या आई आणि बहिणीवरही या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. चांदणी (वय 30) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. अमोल आणि चांदणी यांचे 21 जानेवारी 2013 रोजी लग्न झाले होते. त्यानंतर तीन महिन्यापांसून चांदणी यांचा छळ करण्यात येत असत.
अमोल दारू, जुगारासाठी पैसे मागत. मारहाण करायचा, या त्रासाला कंटाळून चांदणी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर ऍड. पुष्कर दुर्गे यांनी जामिनासाठी अर्ज केला. तपासात ढवळाढवळ न करणे आणि इतर अटींवर न्यायालयाने हा निकाल दिला.