अक्षय कुमारच्या “बेल बॉटम’ची रिलीज डेट जाहीर झाली आहे. हो सिनेमा 27 जुलैला रिलीज होणार आहे. मुख्य म्हणजे हो सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. ही अक्षयकुमारच्या फॅन्ससाठी खूपच आनंदाची बातमी आहे. स्वतः अक्षयकुमारने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती दिली आहे.
“सरतेशेवटी प्रतीक्षा समाप्त झाली. आम्ही सगळ्यांनी तुम्हाला थिएटरमधील अनुभवाचे आश्वासन दिले आहे. “बेल बॉटम’ 27 जुलैला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे थिएटर बंद होती.
थिएटर आता उघडली आहेत. त्यामुळे अन्य मोठ्या सिनेमांप्रमाणेच “बेल बॉटम’ची रिलीज डेट अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली गेली होती. यापूर्वी हे सिनेमा एप्रिलमध्ये रिलीज होणार होता. इतर सिनेमा ज्याप्रमाणे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचे निश्चित झाले तसे “बेल बॉटम’च्या निर्मात्यांनी केले नाही. हा सिनेमा एक स्पाय थ्रिलर मुव्ही आहे. म्हणून त्याचा आनंद थिएटरमध्येच घेणा आवश्यक आहे, असा विचार निर्मात्यांनी घेतला.