लंडन -अजिंक्य रहाणे 18 महिन्यांनी भारतासाठी पहिला “रेड चेरी’ गेम खेळणार आहे आणि 7 जूनपासून ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात त्याला “करा किंवा मरा’ या परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे.
आयपीएलसारख्या टी-20 मधून पाच दिवसांच्या कसोटीमध्ये झटपट बदल करत रहाणेने नैसर्गिक खेळाची योजना आखली आहे आणि त्याला आशा आहे की, सध्या त्याचा बहरलेला फॉर्म आहे तसाच राहील.
दक्षिण आफ्रिकेतील मालिका पराभवानंतर रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दोघांनाही कसोटी संघातून वगळण्याचा कठीण निर्णय 2022 च्या सुरुवातीला घेण्यात आला होता.
परंतु त्याच वर्षी काउंटी क्रिकेटमध्ये बंपर धावा केल्यानंतर त्यांनी संघात पुनरागमन केले. 82 कसोटी सामने खेळणाऱ्या रहाणेला पुनरागमनासाठी एक वर्ष प्रतीक्षा करावी लागली आहे.