मुंबई – “मी शिवसैनिक म्हणून आलेली आहे, शिवसैनिक म्हणूनच काम करेल,’ असे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर म्हटले.
शिवसेनेत प्रवेश केल्यावर ट्रोलिंग करणाऱ्यांचे मी स्वागत करते, असे म्हणून उर्मिला पुढे म्हणाल्या, “मी मराठी मुलगी आहे. त्यामुळे ट्रोलिंगला घाबरून पाऊल मागे घेणार नाही.”
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उर्मिला यांच्या हातावर मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने शिवबंधन बांधले.
यावेळी उर्मिलांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामाचे कौतुकसुद्धा केले. त्याचबरोबर शिवसेनेची महिला आघाडी भक्कम असल्याचे म्हटले. महिला सुरक्षेसारखा विषयांवर काम करायला आवडेल, असे उर्मिला यांनी म्हटले.
यावेळी उर्मिला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर स्तुतिसुमनेही उधळली. करोना काळात चांगले काम करत असल्याचे प्रशस्तीपत्रकही त्यांनी दिले. तसेच ते सर्वांना सोबत घेऊन चालणारे मुख्यमंत्री असल्याचे मत उर्मिला यांनी मांडले.
तसेच त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविषयीही आदर व्यक्त केला.