वाघोली ( प्रतिनिधी) : वाडेबोल्हाई तालुका हवेली जिल्हा पुणे येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व ग्रामपंचायत सदस्य आपापल्या वार्डमधील भाग घरोघरी जाऊन औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करत असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सोबत माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य अशोक इंगळे यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच व सर्व कार्यकारी मंडळाने पूर्ण गाव निर्जंतुकीकरण करण्याचा तसेच कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरोघरी जाऊन औषध फवारणी करण्याचा निर्णय घेतला असून त्याला नागरिकांचा देखील उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसोबत इत्तर सदस्य देखील नागरिकांच्या घरी जाऊन औषध फवारणी करत असल्याने नागरिकांमधून ग्रामपंचायतीच्या सदस्या बद्दलची कृतज्ञता अभिनंदनाच्या रूपाने व्यक्त केली जात आहे.