संपूर्ण देश वर्षातील सर्वात मोठी क्रिकेट लीग ‘ड्रीम११ आयपीएल २०२०’साठी सज्ज होत असताना प्रख्यात सितारे सोनू सूद व रितेश देशमुख क्रिकेटप्रेमींसाठी काहीतरी उत्साहवर्धक गोष्ट सादर करत आहेत. निस्सीम क्रिकेट चाहता असलेल्या त्याने आयपीएलची खरी तयारी – #FanHitMeinJaari साठी सोनू सूद व डिज्नी+ हॉटस्टार व्हीआयपीसोबत सहयोग केला आहे.
या ऑफरिंगसह डिज्नी+ हॉटस्टार व्हीआयपीच्या नवीन सबस्क्रायबर्सना १२ महिन्यांऐवजी एक महिना अधिक म्हणजेच १३ महिन्यांपर्यंत सर्वोत्तम मनोरंजन व लाइव्ह स्पोर्टिंग अॅक्शन पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. चाहते घरी असण्यासह प्रत्यक्षात स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहण्याचा आनंद चुकवणार असल्यामुळे क्रिकेटचा आनंद चुकवलेल्यांसाठी घरीच क्रिकेटचा आनंद मिळणार आहे. डिज्नी+ हॉटस्टार व्हीआयपी सबस्क्रिप्शनसह बहुप्रतिक्षित ड्रीम११ आयपीएल २०२० घरीच पाहता येणार आहे.
रितेश देशमुख त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हणाला, ”मी सोनू सूदकडून प्रेरणा घेत सर्वांचे भले करण्याच्या मूडमध्ये आहे. उत्साहाचा स्तर खूपच उंचावला आहे, कारण ड्रीम११ आयपीएल सुरू होत आहे! हा मुंबईचा माणूस मैदानावर हिटमॅनला पुन्हा एकदा सर्वोत्तम खेळ सादर करताना पाहण्यास सज्ज आहे. पण मला तुमच्या ड्रीम११ आयपीएल पाहण्याच्या आनंदाला अधिक मजेदार बनवायचे आहे.”
#FanHitMeinJaari सह युजर्स सोनू सूद, तसेच रितेश देशमुख, राणा डग्गूबती, युवराज सिंग यांनी शेअर केलेल्या स्पेशल लिंकमध्ये लॉग ऑन करू शकतात आणि १२ महिन्यांच्या पॅकमध्ये अतिरिक्त १ महिन्याचा लाभ घेण्यासाठी डिज्नी+ हॉटस्टार व्हीआयपी सबस्क्राईब करू शकतात. ही ऑफर ड्रीम११ आयपीएल २०२०च्या सुरूवातीच्या वीकेण्डसाठीच लागू आहे.
क्रिकेटचा उत्साह पसरवण्यासाठी रितेश देशमुख यांनी इतर प्रख्यात व्यक्तींना देखील लोकांना सेलिब्रेशनमध्ये सामील होण्यास प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले आहे.
Mein aur @SonuSood ek good news lekar aaye hai for Dream11 IPL fans. @DisneyPlusHSVIP ko subscribe karo iss link se aur 12 nahi 13 mahine cricket hi cricket dekho. IPL ki asli taiyyari, #FanhitMeinJaari. Subscribe https://t.co/8s69mAGcKz @geneliad @vijaysubs @cwtchandni pic.twitter.com/XCL7oaIWek
— Riteish Deshmukh (@Riteishd) September 18, 2020