बाजारात येण्यापूर्वीच आयफोनचे ‘हे’ तीन मॉडेल लीक

नवी दिल्ली – अॅपल (आयफोन) कपंनीचा पुढील नवीन फोन येण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. क्युपर्टिनो-आधारित तंत्रज्ञान कंपनी प्रत्येक सप्टेंबरमध्ये त्यांच्या फोन सिरीज रीफ्रेश करत असते. आयफोन एक्सआय, आयफोन एक्सआय मॅक्स आणि सामान्यांना परवडणारा आयफोन एक्सआर हे तीन नवीन आयफोन मार्केट मध्ये येणार आहे. मात्र, हे तीन आयफोन मार्केट मध्ये येण्यापूर्वीच लीक झाले आहे.

यापूर्वी फक्त या आयफोनच्या कॅमेराचे डिझाईन लीक झाले होते. पण यावेळी संपूर्ण फोनचे मॉडेल लीक झाले आहे. या फोनमध्ये त्रिकोणी आकारात कॅमेरा बसवण्यात आला असून, ट्रिपल कॅमेरा दिला आहे. तर, 5.8 आणि 6.5 (इंच) इतका फोनचा डिस्प्ले आहे. फोनचा मागील भाग संपूर्णपणे काचेचा बनवण्यात आला आहे. त्यामुळे फोन आणखी आकर्षित दिसत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.