निकालापूर्वीच भाजप उमेदवाराची विजयोत्सवाची तयारी; २०० किलो मिठाईची ऑर्डर

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यांचे पार पडल्यानंतर विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांनी एक्‍झिट पोलची आकडेवारी जाहीर केले आहेत. त्यानुसार देशात आता पुन्हा नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखालील एनडीए आघाडीचेच सरकार पुर्ण बहुमत मिळवून सत्तेवर येण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. या चाचण्यांच्या निष्कर्षानुसार कॉंग्रेस प्रणित युपीए आघाडीला व अन्य प्रादेशिक पक्षांना अपेक्षित यश मिळण्याची शक्‍यता नाही. एक्झिट पोलच्या अंदाजानानंतर भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी विजयापूर्वीच जल्लोषाची तयारी करून ठेवली आहे.

गोपाळ शेट्टी यांनी बोरिवलीच्या एका दुकानामध्ये मिठाईची ऑर्डर दिली आहे. ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी दुकानामधील कर्मचारी चक्क मोदींच्या चेहऱ्याचे मुखवटे घालून लाडू आणि पेढे तयार करत आहेत. गोपाळ शेट्टी यांनी तब्बल १५०० ते २०० किलो स्वीट्सची ऑर्डर दिली आहे.

दरम्यान, उत्तर मुंबईतून भाजपच्या गोपाळ शेट्टी यांना काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांचे तागडे आव्हान आहे. अटीतटीच्या या लढतीत गोपाळ शेट्टी याना विजयाचा पूर्ण विश्वास आहे. उर्मिला मातोंडकर यांचे कोणतंही आव्हान नसून यंदाही 5 लाखांपेक्षा अधिक मतांनी मी निवडून येईल, असा दावा गोपाळ शेट्टी यांनी केला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.