दिवाळीपूर्वी मारूती ‘या’ तीन माॅडेल्सवर देत आहे आकर्षक ऑफर; ब्रेझावर 40 हजाराची सूट

नवी दिल्ली – दिवाळीपूर्वी देशातील सर्वात मोठी फोर व्हिलर कार उत्पादक मारूती कंपनी आपल्या तीन माॅडेल्सवर आकर्षक ऑफर देत आहे. या ऑफरमध्ये मारूती ग्राहकांना कॅश डिस्काउंट देत आहे. त्याचबरोबर कंपनीने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 6 हजार रूपयांपर्यंतची एलटीसी बोनस ऑफर देण्याचे ठरवले आहे. या सूटचा फायदा केंद्र सरकारचे कर्मचारी घेऊ शकतात. मारूतीची ही ऑफर देशभरातील सर्व डीलर्सकडे उपलब्ध असणार आहे.

मारूती स्विफ्ट वर आकर्षक सूट –

या दिवाळीत ग्राहकांना मारूती स्विफ्ट खरेदीवर 35 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. दिल्लीत (एक्स शोरूम) मारूती स्विफ्टची कमीत कमी किंमत 5 लाख 19 हजार रूपये आहे. तर टाॅप माॅडेलची किंमत 8 लाख 2 हजार रूपये आहे.

मारूती विटारा ब्रेझा –

मारूती आपल्या विटारा ब्रेझावर 40 हजार रूपयांची सूट देत आहे. दिल्लीत या कराची (एक्स शो रूम) किंमत 7 लाख 34 हजार रूपये आहे. तर टाॅप माॅडेलची किंमत 11 लाख 2 हजार रूपये आहे.

मारूती स्विफ्ट डिझायर –

मारूतीच्या या स्विफ्ट डिझायर कारवर 39 हजार रूपयांची सूट मिळणार आहे. दिल्लीत (एक्स शोरूम) या कारची किंमत 5 लाख 89 हजार रूपये आहे. तर टाॅप माॅडेलची किंमत 8 लाख 81 हजार रूपये आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.