एक डिसेंबरपुर्वी सरकार स्थापनेची सर्व प्रक्रिया पुर्ण होणार

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा दावा

मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचा पेच आता सुटण्याची चिन्ह दिसत आहेत. कारण त्याविषयीची माहिती कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनच्या नेत्यांकडूनच समोर येत आहे. दरम्यान, सरकार स्थापनेसंदर्बात आमचा संपर्क फक्त कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत सुरु आहे. सरकार स्थापनेसंदर्भात आमचा संपर्क उत्तम पध्दतीने सुरु आहे. 1 डिसेंबरपूर्वी सरकार स्थापनेची सर्व प्रक्रिया पूर्ण होईल. शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार येणार असल्याचे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सांगितले. तसेच, सोनिया गांधींना भेटण्याचे अद्याप प्रयोजन नाही, असे देखील त्यांनी सांगितले. मुंबईमध्ये संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली त्यावेळी ते बोलत होते.

शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचा निर्णय पक्का आणि अंतिम झाला आहे. हे राज्य आम्हाला पुढच्या पाच वर्ष चालवायचे आहे अशी आमची भूमिका ठरली आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय येऊल असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

एकसुत्री कार्यक्रमावर बुधवारी आघाडीची बैठक झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी फोनवरुन चर्चा केली. पुढील दोन दिवसात अंतिम निर्णयावर पोहचतील, असे संजय राऊत यांनी सांगितले. तसंच, रात्री आघाडीची बैठक लांबली होती. त्यामुळे आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.