शेवगाव : भक्ताच्या हातून जाणते-अजाणतेपणे पाप कर्म होताना अथवा चुकीचे काम होण्याअगोदर प्रत्येकाला आपापला ‘अंतरात्मा’ असे कृत्य करण्यापासून परावृत्त होण्याचा कौल देत असतो. अशावेळी ‘भगवंत आवाज’ देत असतो. निर्मळ भावनेने केल्या जात असलेल्या भक्तीने भारावत देव अशा भक्तांना पापकर्मातून बाहेर काढत असतो.
मात्र स्वतःच्या स्वार्थामुळे अशावेळी देवाचा आवाज ऐकायला येत नसल्याचे प्रतिपादन श्रीक्षेत्र देवगडचे उत्तराधिकारी महंत प्रकाश नंदगिरी महाराज यांनी केले. तालुक्यातील कर्ऱ्हेटाकळी या ठिकाणी श्रीनाथ आश्रमातील श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानात आयोजित त्रिदिनी कीर्तन महोत्सवातील काल्याचे कीर्तनात ते बोलत होते.
यावेळी श्रीनाथ आश्रमाचे मठाधिपती सतीश महाराज घाडगे, दीपक महाराज उगले, सोमनाथ महाराज कराळे यांचेसह परिसरातील भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीनाथ आश्रमाचे भक्तगण तसेच ग्रामस्थांनी मोठे परिश्रम घेतले. पैठणच्या मृदुंग महर्षी वारकरी शिक्षण संस्थेचे विशेष सहकार्य लाभले.