“कुठल्याही निवडणुका जाहीर होण्याआधी….” केदार शिंदेंची पोस्ट चर्चेत

मुंबई –  प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक आणि निर्माते ‘केदार शिंदे’ आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आपले मत एकदम परखड पणे मांडत असतात. त्यामुळेच का होईना केदार शिंदे सतत माध्यमंध्ये चर्चेत असतात. नुकतंच केदार शिंदेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

‘कुठल्याही निवडणुका जाहीर होण्याआधी आमची तारीख जाहीर!’ असं केदार शिंदेनी म्हंटलं आहे. दरम्यान, केदार यांची ही पोस्ट कुठल्याही राजकीय विषयाशी सबंधीत नसून आपल्या आगामी  “बाईपण भारी देवा..’ या सिनेमाशी निगडित आहे. सामान्य माणसाच्या आजुबाजूला जे काही होत असते ते केदार शिंदे उत्तम पद्धतीने मोठ्या पडद्यावर दाखवतात.

केदार शिंदे यांनी ट्वीट करत ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. “कुठल्याही निवडणुका जाहीर होण्याआधी आमची तारीख जाहीर! ‘बाईपण भारी देवा.’ 28 जानेवारी 2022 पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!’ या आशयाचे ट्विट केदार यांनी केलं आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.