ट्विटरवर पंतप्रधान मोदींसाठी #BechendraModi  हॅशटॅग होतोय ट्रेंडिंग

नवी दिल्ली : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रातील दिग्गज नेत्यांच्या सभा होताना दिसत आहेत. या सभेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होतानाही पाहायला मिळत आहेत. यासर्व निवडणुकांचा धुराळा हा सोशलमीडियावर पडत आहे. कारण सत्ताधारी आणि विरोधक हे या निवडणूकीत सोशलमीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत.अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त आहेत. परंतु अशाचवेळी नेटकऱ्यांकडून त्यांना विरोध होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पहिल्या भाषणाला मराठीमधून सुरुवात केली. #मोदी_परत_जा हा हॅशटॅग काही दिवसांपुर्वी ट्विटवर इंडियावर टॉप ट्रेण्डींग होता. त्यानंतर आता नेटकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर आक्षेप घेत #BechendraModi हा हॅशटॅग सुरू केला आहे.

ट्विटर इंडियावर #BechendraModi हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. अनेक नेटकऱ्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या परिस्थितीवर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. देशातील सर्वात मोठी, सार्वजनिक तेल व वायू विक्री व विपणन कंपनी असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात बीपीसीएलचे खासगीकरण करण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मध्यंतरी समोर आली होती. या कंपनीतील निम्म्याहून अधिक, 53 टक्के हिस्सा विक्रीची तयारी केंद्र सरकार करत असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उत्सुकखरेदीदारांसाठी निविदा काढण्यात येणार आहे.

देशातील खासगी इंधन व्यवसाय क्षेत्रात वरचष्मा असलेली मुकेश अंबानी यांचा प्रवर्तित रिलायन्स इंडस्ट्रीज समूह या प्रक्रियेत रस घेण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. तसंच एमटीएनएल, बीएसएनएल सारख्या कंपन्यांच्या परिस्थितीवरूनही सर्वांनी निशाणा साधला आहे.

#BechendraModi हा हॅशटॅग सध्या ट्रेंड होत असून अनेकांनी या माध्यमातून मोदींवर टीका केली आहे. सरकार रोजगार, रस्ते यावर काही बोलत नसून यावर प्रश्न विचारला तर सरकार दुसऱ्या विषयांकडे लक्ष नेतं असा आरोप काही नेटकऱ्यांनी केला आहे. तर काही नेटकऱ्यांनी बीएसएनएल, एमटीएनएल आणि रेल्वेच्या खासगीकरणाचा सरकारचा डाव असल्याचं म्हणत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)