Arun Singh Rana | टीव्ही अभिनेता अरुण सिंह राणाने 2013 मध्ये सौरभ राज जैनच्या ‘महाभारत’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र सध्या अरुण सिंह राणा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. त्याने लग्नाच्या 4 वर्षानंतर घटस्फोट घेतला आहे. त्याने यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली होती.
अरुण सिंह राणाने 2018 मध्ये हिमाचलमध्ये शिवानीशी लग्न केले. यानंतर एका मुलाखतीत त्याने सांगितले की, “डिसेंबर 2024 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला आहे. तो खूप काळ मानसिक तणावातून गेला होता पण कुटुंबाच्या पाठिंब्याने तो बाहेर आला. रिलेशनशिप तुटल्यानंतर मी कठीण प्रसंगांचा सामना केला. परिस्थितीचा सामना करताना अनेकवेळा जीवन संपवण्याचा विचार येतो आणि तुम्हाला कोणतीही आशा दिसत नाही. तेव्हा कधीही हार मानू नये कारण अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळचा प्रकाश नेहमीच असतो. जीवन ही देवाने दिलेली देणगी आहे. ज्याचा आदर केला पाहिजे. एखाद्यावर प्रेम केले पाहिजे आणि चांगल्या कर्माने जगले पाहिजे.” Arun Singh Rana |
&n
View this post on Instagram
पुढे अरुण म्हणाला, “सध्या मी बरा होत आहे. कुटुंब मला साथ देत आहे. मी माझ्या बहिणीचा आणि पालकांचा खूप आभारी आहे. 2025 मध्ये मला करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. एका चुकीच्या निर्णयामुळे मी माझ्या आयुष्यातील चार वर्षे गमावली. मला प्रेक्षकांचे पुन्हा प्रेम मिळावायचे आहे. चांगल्या भूमिका करण्यासाठी मी उत्सुक आहे”
अरुण सिंह राणाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ‘महाभारत’ या मालिकेनंतर तो ‘दिया और बाती हम’मध्येही दिसला होता. याशिवाय ‘काल भैरव का रहस्य’, ‘ये कहां आएंगे हम’, ‘कसम’मध्ये देखील त्याने काम केले आहे. शेवटचा तो ‘नागिन 6’ मध्ये दिसला होता. Arun Singh Rana |
हेही वाचा:
90 तास काम: भारतात कर्मचारी आठवड्याला किती तास काम करतात? त्यांना किती पगार मिळतो? वाचा