सॅम माणेकशॉ यांच्या बायोपिकचे शीर्षक ठरले

देशाचे पहिले फिल्डमार्शल सॅम माणेकशॉ यांच्या बायोपिकचे शीर्षक आता निश्‍चित झाले आहे. सॅम माणेकशॉ यांचा रोल विकी कौशल साकारणार आहे, हे यापूर्वीच निश्‍चित झाले आहे आणि या सिनेमाचे नाव असणार आहे “सॅम बहाद्दुर’.

सॅम माणेकशॉ यांच्या ज्न्मदिनीच विकी कौशलने इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये या सिनेमाच्या शीर्षकाची घोषणा केली. त्याने एक छोटासा व्हिडिओदेखील शेअर केला आहे. त्यामध्ये त्याच्याच आवाजात एक ऑडिओ देखील आहे. “कई नामों में पुकारा गया. एक नाम से हमारे हुए. सॅम बहाद्दुर’ असे या व्हिडिओमध्ये विकी कौशल म्हणतो.

सॅम माणेकशॉ यांच्या गेटअपमध्ये त्याची एक छबी देखील या व्हिडिओत दिसते आहे. जाड जाड मिशा, मिलीटरीचा युनिफॉर्म घातलेला विकी सेम टू सेम माणेकशॉ दिसतो आहे. सॅम माणेकशॉ यांचे मिलीटरीतील करिअर तब्बल चार दशकांचे होते.

या कारकिर्दीत त्यांनी पाच युद्धेही अनुभवली. फिल्डमार्शल पदापर्यंत बढती मिळवणारे ते भारतीय लष्करातील पहिले अधिकारी होते. या बायोपिकचे डायरेक्‍शन मेघना गुलजार करणार आहे. विकी कौशल आणि मेघना गुलजार यांनी यापूर्वी “राजी’ साठी एकत्र काम केले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.