बॉलीवूडमधील बेबो अर्थात अभिनेत्री करीना कपूर-खानने 21 फेब्रुवारीला दुसऱ्या मुलाला जन्म दिला. विशेष म्हणजे प्रेग्नेंसीच्या अखेरच्या दिवसांपर्यत करीना काम करत होती. त्यानंतर ती 16 दिवसांनंतर पुन्हा कामावर परतली आहे. याचे काही फोटो खुद्द करीनाने चाहत्यांशी शेअर केले आहेत.
View this post on Instagram
करीनाने आपल्या इंस्टा स्टोरीमध्ये अनेक फोटो पोस्ट केले ओहत. करीनाने आपल्या मेकअप मॅनचा फोटो शेअर करत लिहिले की, असे वाटते की आज कामावर आहे. तसेच करीनाने मेकअप केल्यानंतरचा एक सेल्फीही शेअर केला आहे.
View this post on Instagram
;
याशिवाय तिने मेकअप चेयरवर बसलेलाही फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहिला असता करीनाने हेअर कट केला असल्याचे दिसून येते. दरम्यान, दुस-यांदा आई झाल्यानंतरही ती विश्रांती घेण्याच्या मुडमध्ये नसल्याचे दिसते. या फोटोंवरून करिनाला काम करण्यास किती आवडते याचाही अंदाज चाहत्यांना येत आहे.
View this post on Instagram
प्रेग्नेंसीच्या काळातही करीना खूप ऍक्टिव्ह दिसत होती. ती जाहिरात आणि प्रमोशनल व्हिडिओज्मध्य झळकत होती. तसेच या काळात तिने “व्हाट वीमेन वॉन्ट’ हा रेडियो शो देखील केला होता. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास डिलीवरीच्या पूर्वीच करीनाने आमिरसोबतच्या आगामी “लाल सिंह चढृढा’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते. आता हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.