रानात जनावरे राखण्यावरून मारहाण

दोन लाखांची रोकड लंपास

देहूरोड – लष्कराच्या मोकळ्या जागेवर जनावरे चारण्याच्या कारणावरून पाच जणांनी एकाला लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून दांडक्‍याने मारहाण केली. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. निगडी येथील पुना गेटसमोरील लष्कराच्या मोकळ्या जागेवर शुक्रवारी (दि. 10) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.

मोहन बाबुराव पांडुळे (वय 22) असे जखमीचे नाव आहे. काळूराम भालेकर, मन्नू टिल्लू, राहुल टिल्लू व अन्य दोघे सर्व. रा. तळवडे) असे मारेकऱ्यांची नाव आहे. याबाबत राहुल बाबाजी पांडुळे (वय 26, रा. हॉटेल पुनागेटसमोर, निगडी) याने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथील लष्कराच्या मोकळ्या जागेवर राहुल पांडुळे आणि त्याचा भाऊ मोहन पांडुळे दोघेही मेंढ्या चारत होते. तेथे मारहाण करणारे पाच जण गायी चारत होते. जनावरे चारण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसन होऊन पाच जणांनी लोखंडी कोयत्याचा धाक दाखवीत, लाकडी दांडक्‍याने मारहाण करीत मोहनचा डावा पायाला दुखापत केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. उपनिरीक्षक अशोक कोकाटे तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.