सोसायटीच्या मेन्टेनन्स बिलावरुन व्यवस्थापकाला मारहाण

महानगरपालिकाच्या माजी सुरक्षा रक्षक अधिकाऱ्याचे कृत्य

पुणे – पुण्यातील मध्यवस्तीत असलेल्या शुक्रवार पेठेतील व्यवसायिक प्रेस्टिज पॉईंट सोसायटीत गुरुवारी (दि.1 एप्रिल 2021 रोजी) सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास मेंटेन्सचे बिल दिल्याच्या रागात सोसायटीचे व्यवस्थापकाला मारहाण केल्याची घटना घडली . यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

याप्रकरणी प्रेस्टिज पॉईंट सोसायटीचे व्यवस्थापक संतोष उद्धव वाफगावकर (वय 40, रा.महात्मा फुले पेठ, गोटे वाडा पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानूसार खडक पोलीस स्टेशन मध्ये संतोष पवार यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संतोष पवार हे महानगरपालिकेमध्ये सुरक्षा रक्षक खात्यातील मुख्य अधिकारी होते अशी माहिती पोलिसांनी दिली.

प्रेस्टिज पॉईंट सोसायटीचे व्यवस्थापक संतोष वाफगावकर यांनी नेहमीप्रमाणे सोसायटी मेंटेनन्सचे बिल सोसायटीतील सर्व सभासदांना पाठवले होते. त्यातील सोसायटीच्या इमारती असलेल्या संतोष पवार यांचे कार्यालय आहे. त्यांनीही बिल पाठवण्यात आले. त्यांनी व्यवस्थापक संतोष वाफगावकर यांना गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास ऑफिसमध्ये काही फोन करून वाफगावकर यांना बोलावून घेतले.

यानंतर दमदाटी करत सोसायटीतील पदाधिकारी सूर्यवंशी यांचे ऐकतो का ? मी सांगितले तरी सूर्यवंशी याला पदाधिकारी म्हणून का काढले नाही, मला मेंटेनन्सचे बिल का पाठवले ?असा जाब विचारला. यानंतर शिवीगाळ करत लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. याप्रकारामुळे सोसायटीतील सदस्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दखलपात्र गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.