तरुणीचा विनयभंग करून नातेवाइकांना मारहाण

नारायणगाव -खोडद येथील 17 वर्षीय तरुणीचा विनयभंग करून तिच्या नातेवाइकांना शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या 9 जणांवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

लता पंढरीनाथ खुडे, पुष्पा रवींद्र खुडे, पंढरीनाथ रामभाऊ खुडे, आकाश बबन खुडे, सुमन बबन खुडे, रमाकांत खुडे, रंजाबाई काशिनाथ खुडे, निलेश गेनूभाऊ खुडे, रवींद्र खुडे (सर्व रा. खुडे वस्ती खोडद) अशी गुन्हा दाखल झोलल्यांची नावे आहेत. फिर्याद 17 वर्षीय तरुणी (रा. आंबेडकर नगर) हिने दिली आहे.

खोडद गावातील खुडेवस्तीत 2 ऑगस्टला रात्री आंबेडकर नगर येथून खुडेवस्ती पलीकडे जात असताना रवींद्र खुडे हा वडिलांना शिवीगाळ करत असताना दिसला म्हणून, त्याला विचारू लागले असता त्याने जवळ येऊन माझा डावा हात पकडत दमदाटी केली. तरूणीने आईला जोरजोरात हाका मारल्या व त्यांचे हातातून हात हिसकून मागे येऊ लागले असता त्यांनी तरुणीच्या अंगातील ड्रेस पकडून ओढला व फाटला. तरुणीची आई, चुलती व इतर भावंडे आली. 

त्यांनी अंगावरील फाटलेला ड्रेस पाहून चिडून रवींद्र खुडे यासजराब विचारला. यावेळी रवींद्र खुडे यांच्या घरातील 8 जणांनी आई, चुलती व तरुणीची भावंडे यांना मारहाण करत शिवीगाळ केली. यात आईच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र गहाळ झाले. या पुढील तपास पोलीस हवालदार नीता शेळके ह्या करीत आहेत. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.