राहुरी : सामाईक बांधावरील माती टाकल्याच्या कारणावरून आरोपींनी कचरु गांगुर्डे यांना काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.माहेगाव येथे दि.३ डिसेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान ही घटना घडली.
कचरू बाबुराव गागुर्डे यांनी राहुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. कचरु गांगुर्डे हे त्यांच्या शेतात काम करत होते. त्यावेळी आरोपी तेथे आले, तू आपल्या सामाईक बांधावरील माती आमचेकडे का टाकली, असे म्हणून गांगुर्डे यांना काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
घटनेनंतर कचरु गागुर्डे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरूनआरोपी चंदु पंढरीनाथ पवार, सुरेश पंढरीनाथ पवार, गोरख पंढरीनाथ पवार तसेच एक अनोळखी इसम (सर्व रा. महाडुक सेंटर, माहेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.