पिंपरी -दहीहंडीची वर्गणी न दिल्याच्या रागातून चार जणांनी तरुणाला मारहाण केल्याची घटना रविवारी (दि. 21) रात्री संत तुकारामनगर, पिंपरी येथे घडली.
पवन शिवराज नुदनुरे (वय 21, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिनेश पाटील आणि त्याच्या तीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या दहीहंडी उत्सवासाठी फिर्यादीकडे दहा हजार रुपये वर्गणी मागितली होती. ती वर्गणी फिर्यादी यांनी दिली नाही. त्यावरून आरोपींनी फिर्यादी पवन आणि त्यांचे मामा राजू देशमुख यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.