नारायणगाव -किरकोळ कारणावरून लाकडाने मारहाण करून दमदाटी व शिवीगाळ करणाऱ्या 15 जणांवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सुरेंद्र उर्फ बन्सी सोनू घायतडके, वनिता घायतडके, अनिकेत घायतडके, आकाश घायतडके, अस्मिता उर्फ बायडी घायतडके, सुनील घायतडके, रोहन घायतडके, लहू घायतडके, पुष्पा घायतडके, गौतमी घायतडके, शंकर घायतडके, प्रितेश घायतडके, निलेश घायतडके (सर्व रा. खोडद) व सचिन भोजने, नवीन सोनवणे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर रवींद्र पंढरीनाथ खुडे (रा. खोडद) यांनी फिर्याद दिली आहे.