अमरावती – जगभरामध्ये सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अतिशय संसर्गजन्य असलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गापासून स्वतःला वाचवण्यासाठी तोंड व नाक झाकणे गरजेचे आहे. यासाठीच सरकारतर्फे सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करा अशा सूचना वारंवार देण्यात येतायेत. मात्र आपल्या कार्यालयातील पुरुष कर्मचाऱ्याला मास्क वापरण्याचा सल्ला देणं एका महिला कर्मचाऱ्यास चांगलंच महागात पडलंय.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आंध्र प्रदेश पर्यटन विभागाच्या अखत्यारीत असलेल्या नेल्लोर हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका पुरुष कर्मचाऱ्याने कार्यालयातील एक महिला कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. याबाबत पोलिसांकडे नोंदवण्यात आलेल्या तक्रारीमध्ये, ‘सदर महिला कर्मचाऱ्याने कार्यालयात काम करणाऱ्या एका इतर पुरुष कर्मचाऱ्याला मास्कचा वापर करण्याचा सल्ला दिला. यावरून संतप्त झालेल्या पुरुष कर्मचाऱ्याने महिलेस लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.’ असा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले असून यात सदर पुरुष कर्मचारी महिला कर्मचाऱ्याच्या आसनाकडे आवेशाने धावत जात असून महिलेचे केस पकडत तिला मारहाण करताना दिसत आहे. कार्यालयातील इतर कर्मचारी त्यास रोखण्याचा प्रयत्न करताना दिसतायेत.
The police complaint in the matter states that the incident took place after the woman asked the man to wear a mask. It also mentions that the two had previous enmity. #AndhraPradesh https://t.co/TPz9vtrkrQ
— ANI (@ANI) June 30, 2020