पिंपरी – करोनाची साथ सुरू असल्याने मित्राला घरीच थांबण्यास सांगणाऱ्या व्यक्तीला एकाने बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 21) दुपारी पावणेबाराच्या सुमारास राजवाडे नगर, काळेवाडी येथे घडली.
राजू मेलाराम वर्मा (वय 35, रा. राजवाडे नगर, काळेवाडी) असे जखमी व्यक्तीचे नाव असून त्यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. 21) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सईद अहमद खान (रा. काळेवाडी, वाकड) असे आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी वर्मा यांनी त्यांचा मित्र विजय यादव यांना सध्या “करोना’ची साथ सुरू असल्याने घरीच थांब, खर्चासाठी पैसे लागत असतील तर मला सांग’ असे सांगितले. आरोपी खान याने वर्मा यांना शिवीगाळ करत “तू माझ्या कामगारांना घरी बसण्यास सांगतो का’ असे म्हणून मारहाण केली.