पिंपरी – दोन महिन्यांचा थकलेला पगार न मिळाल्याने सुरक्षा रक्षकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने कंपनीतील फिल्ड ऑफिसरला बाहेर बोलावून बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 20) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास हिंजवडी फेज एक येथे घडली.
कृष्णा रगडे, सावन साळुंखे, सुरज साळुंखे (तिघेही रा. दिघी) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी निलेश अशोक तायडे (वय 36, रा. माणगाव, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी तायडे हे पेरे ग्रीन ग्रेडिंग कंपनी दिघी येथे फिल्ड ऑफिसर म्हणून नोकरी करतात. तर आरोपी कृष्णा रगडे त्याच कंपनीत सुरक्षा रक्षक होता. कृष्णा याचा मार्च, एप्रिलचा पगार बाकी असल्याने चिडलेल्या कृष्णाने दोन साथीदारांसोबत मिळून तायडे यांना मारहाण केली.