बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान ही सोशल मीडियावर सध्या खूपच प्रसिद्धीच्या झोतात आहे. ती सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.
साराने काही दिवसांपूर्वीच समुद्रकिनारी एक जबरदस्त फोटोशूट केले आहे. याचा एक फोटो तिने इंस्टाग्रावर पोस्ट केला आहे. यात समुद्रकिनारी फिरत असताना तिचा अंदाज खूपच जबरदस्त असताना दिसत आहे.
सारा अली खानचा हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. या फोटोवर चाहत्यांना असंख्य कमेंट करत साराची प्रशंसा केली आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. यात सारा आपल्या केदारनाथ या चित्रपटातील स्वीटहार्ट या गाण्यावर डान्स करताना दिसत होती.सारा अली खानने नेहमीप्रमाणे या व्हिडिओतूनही धम्माल केली.
View this post on Instagram
Control your mind & free your spirit 🧠💞 #stayhome #staysafe #staypositive 🌞🤗🍑💥
दरम्यान, साराने केदारनाथ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते. विशेष म्हणजे, या चित्रपटासाठी तिला बेस्ट डेब्यू ऍक्ट्रसचा अवॉर्डदेखील मिळाला होता.
View this post on Instagram
Our hearts, minds and souls aren’t in lockdown 💭🕊🗝🆓 #stayhome #staystrong #staypositive #staysafe
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास सारा अली खान लवकरच कुली नंबर वन आणि अतरंगी रे चित्रपटात झळकणार आहे. कुली नंबर वनमध्ये तिच्यासोबत वरुण धवन, तर अतरंगी रेमध्ये अक्षय कुमार आणि धनुष मुख्य भूमिका साकारत आहेत.