मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या खूपच चर्चेत आहे. मात्र ही चर्चा तिच्या आगामी चित्रपटाची नसून मालदिव येथील फोटोंची आहे. जान्हवी कपूर सध्या मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
यावेळी तिने तिच्या चाहत्यांसाठी आपले काही फोटो शेअर केले आहेत. जान्हवी कदाचित पहिल्यांदाच अशा लूकमध्ये दिसली.
तिच्या चाहत्यांनासुद्धा तिचे हे फोटो खूप आवडले आहेत. या फोटोत जान्हवीने निळ्या कलरचा स्वीमसूट घातला आहे आणि वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.
मावळता सूर्य, निळंशार पाणी आणि जान्हवीच्या या अदा पाहून चाहते घायाळ झाले आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास जान्हवी कपूर नुकतीच “रुही’ चित्रपटात झळकली होती.
या चित्रपटात प्रथमच राजकुमार राव आणि जान्हवी यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
कोविड -19 च्या नियमांचे पालन करण्याच्या अटीवर सिनेमागृहे 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली होती. त्यानंतर प्रदर्शित झालेला हा चित्रपट हिट ठरला होता.