यश मिळविण्यासाठी उत्कटता पुरेशी : आमिर खान

पुणे – केवळ सिनेमाच नव्हे तर इतर सर्व प्रकारच्या कलांचा प्रभाव तरुणांच्या मनावर पडत असतो. सर्जनशील लोकांचा एकमेव समूह हा लोकांच्या हृदयाला स्पर्श करतो, ते लोकांच्या जीवनात आशा पल्लवित करण्याचे काम करतात, असे विधान अभिनेता आमिर खान याने केले. शनिवार, दिनांक २३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता सिंबायोसिस तर्फे संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत त्याला वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

आपल्या चित्रपटांना मिळणाऱ्या चीन आणि हॉंगकॉंग मधील लोकप्रियतेबद्दल बोलताना आमिर म्हणाला कि, याचे सर्व श्रेय तेथील प्रेक्षकांना जाते. ते त्यांच्या देशाबाहेरील संस्कृतीचे स्वागत करीत आहेत आणि यासाठी आपण त्यांचे कौतुक केले पाहिजे तसेच त्यांच्याकडून शिकले देखील पाहिजे. चित्रपटांना मिळणाऱ्या लोकप्रियतेचा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे चित्रपट पायरसी पायरसीरीने मला चीनमध्ये लोकप्रिय बनवले असे देखील अमीर खान ने पुढे बोलताना सांगितले. माझ्या विचारानुसार सर्जनशील बदल हा एक महत्त्वाचा बदल आहे. सध्या मुख्य प्रवाहात विविध प्रकारच्या कथा येत आहेत हे या पूर्वी घडत नव्हते.

आमिरने आपल्या देशातील आरोग्य सुविधांविषयी बोलताना सांगितले की, आरोग्य सेवा प्रत्येकासाठी समान असली पाहिजे. एखाद्याच्या सांपत्तिक स्थितीनुसार त्याला / तिला कोणत्या प्रकारचा उपचार मिळेल हे ठरवले जाऊ नये. सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा प्रत्येकासाठी उपलब्ध असावी. यश मिळविण्यासाठी उत्कटता पुरेशी आहे. जीवनात यश मिळविण्यासाठी ही एक मूलभूत गोष्ट आहे. शिकण्याची, वाढण्याची इच्छा खूप महत्वाची आहे. यशाची प्रवृत्ती, कठोर परिश्रम, चिकाटी कधीही सोडू नका. आपला प्रवास उत्साहपूर्ण करा, आपल्या चुका स्वीकारा तसेच त्यांच्याकडून शिका. आयुष्यात जे काही कराल त्यामध्ये तुमच्यातील सर्वोत्तम देत राहा.

स्वतःच्या सोशल मीडियातील सक्रियतेबद्दल बोलताना देताना आमिर म्हणाला, मी सोशल मीडियावर जास्त सक्रिय नाही, लोकांनी मला पाहावे असे मला वाटत नाही परंतु माझ्या कामाद्वारे त्यांना मला अनुभवता यावे अशी माझी इच्छा असते.

सिंबायोसिस चे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र- कुलपती डॉ विद्या येरवडेकर यांनी स्वागतपर भाषण केले. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, यांनी आभारप्रदर्शन केले तर सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया कम्युनिकेशनच्या संचालिका डॉ. रुची जग्गी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.