पुणे बार असो. निवडणूकीचे अंतिम चित्र स्पष्ट

अध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत : खजिनदार पदी ऍड. भाग्यश्री गुजर बिनविरोध

पुणे: वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणूकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. अध्यक्ष पदासाठी ऍड. सतिश मुळीक, ऍड. पांडुरंग थोरवे आणि ऍड. प्रवीण येसादे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. एकमेव अर्ज आल्याने खजिनदार पदी ऍड. भाग्यश्री गुजर यांची बिनविरोध निवड झाली. दहा कार्यकारिणी सदस्यही निवडण्यात आले आहेत. निवडणूकीसाठी 30 जानेवारी रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी रात्री उशिरा निकाल जाहिर होणार आहे.

उपाध्यक्ष पदाच्या दोन जागांसाठी ऍड. संजय भालघरे, ऍड. सचिन हिंगणेकर आणि ऍड. योगेश तुपे हे निवडणूक रिंगणात आहेत. तर, सचिव पदाच्या दोन जागांसाठी ऍड. विकास बाबर, ऍड. घनश्‍याम दराडे, ऍड. निलेश निढाळकर आणि ऍड. पीयुष राठी यांच्यात लढत होणार आहे. हिशेब तपासणीस पदासाठी ऍड. ओंकार चव्हाण आणि ऍड. गणेश म्हस्के यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. ऍड. महेश भांडे, ऍड. आनंद धोत्रे, ऍड. विराज करचे, ऍड. आकाश मुसळे, ऍड. प्रिती पंडित, ऍड. सचिन पोटे, ऍड. अक्षय रतनगिरी, ऍड. अमोल तनपुरे, ऍड. अमित यादव आणि ऍड. सुषमा यादव यांची निवड झाली आहे. निवडणूकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. गिरीश शेडगे हे काम पाहत आहेत. ऍड. विजय आमले, ऍड. अनिल नाईक, ऍड. नंदकुमार वीर, ऍड. प्रशांत माने, ऍड. के.टी. आरू, ऍड. किर्तीकुमार गुजर, ऍड. सुप्रिया कोठारी, ऍड. समीर घाटगे, ऍड. विजयराव दरेकर आणि ऍड. मंगेश लेंडघर हे अतिरिक्त निवडणूक अधिकारी आहेत. ऍड. पंडित धुमाळ, ऍड. अनिशा फणसळकर, ऍड. रेखा करंडे, ऍड. महेंद्र कुमकर, ऍड. विजयकुमार शिंदे, ऍड. सुहास फराडे, ऍड. विजय माने आणि ऍड. जयदीप कदम हे उपनिवडणूक अधिकारी आहेत. तर, ऍड. सुधीर घोरपडे, ऍड. संतोष घुले, ऍड. विक्रम हगवणे, ऍड. राकेश ओझा, ऍड. प्रतिक देशमाने, ऍड. स्वप्निल चांदेरे, ऍड. राहुल भरेकर, ऍड. श्रृती संकपाळ आणि ऍड. मुकुंद पवार हे सहायक निवडणूक अधिकारी आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.