नवी दिल्ली – करोना संसर्गाच्या सद्यकाळात जेथे लोक ऑक्सिजन सिलिंडर, औषधे, आयसीयू बेड्स आणि रेमेडिसिव्हिरचे इंजेक्शन्स मिळविण्याबद्दल चिंतेत आहेत, तिथेच काही लोक या परिस्थितीतही नफा कमावण्याच्या मागे आहेत. परिस्थिती अशी आहे की लोकांना अतिशय महागड्या किंमतीत ऑक्सिजन सिलिंडर, औषधे आणि रेमेडिसिव्हिर इंजेक्शन खरेदी करण्यास भाग पाडले जाते. सध्या रेमेडिसिव्हिर इंजेक्शनची मागणी खूप वाढली आहे.
आपल्या प्रियजनांच्या आयुष्यासाठी लोक वाट्टेल ती किंमत देऊन ही महागडी इंजेक्शन्स खरेदी करत आहेत. बर्याच राज्यात, हे इंजेक्शन मिळवणे, शोधणे सोपे नाही. प्रॉफिटखोर माणसे ही इंजेक्शन्स 20 ते 40 हजारांच्या किंमतीवर विकत आहेत. सगळ्यात कहर म्हणजे तुम्ही अमाप पैसे खर्च करून जे इंजेक्शन खरेदी करता, ते देखील कधी कधी बनावट निघते ! अनेक ठिकाणी अशी बनावट रेमेडिसिव्हिर इंजेक्शन तयार करून विकणाऱ्या टोळ्याच कार्यरत झाल्याचे आढळून आले आहे.
बनावट रेमेडिसिव्हिरच्या वाढत्या घटनांमुळे लोकांची चिंता आणखी वाढली आहे. अशा परिस्थितीत, आपण खरा आणि बनावट रेमेडिसिव्हिर यामधील फरक ओळखणे खूप महत्वाचे आहे . वास्तविक रेमेडिसिव्हिरच्या पॅकेटच्या वरील काही चुका वाचून आपल्याला खरे इंजेक्शन आणि बनावट इंजेक्शन यांच्यातील फरक माहित होऊ शकतो. चला, जाणून घेऊया सविस्तर.
100 मिलीग्रामचे हे इंजेक्शन कुपीमध्ये फक्त पावडरच्या रूपातच राहते. 2021 मध्ये बनविलेल्या या इंजेक्शनच्या कुपींवर ‘आरएक्सरेम्डेसिव्हिर’ लिहिलेले आहे. इंजेक्शन बॉक्सच्या मागील बाजूस एक बारकोड देखील बनविला जातो. याबाबत दिल्ली पोलिस गुन्हे शाखेच्या डीसीपी मोनिका भारद्वाज यांनी ट्वीट करून अस्सल व बनावट औषध कसे ओळखावे हे सांगितले आहे.
Attention!!
Lookout for these details before buying Remdesivir from the market. pic.twitter.com/A2a3qx5GcA— Monika Bhardwaj (@manabhardwaj) April 26, 2021
– अस्सल रेमेडिसिव्हिरच्या पॅकेटवर इंग्रजीमध्ये ‘For use in’ असे लिहिलेले आहे, तर बनावट इंजेक्शनच्या पॅकेटवर ‘for use in’ असेच लिहिलेले आहे, मात्र ‘फॉर’ या शब्दाची सुरुवात कॅपिटल लेटरने होत नाही.
– अस्सल इंजेक्शनच्या पॅकेटमागील चेतावनी लाल रंगात आहे तर बनावट पॅकेटवरील चेतावनी काळ्या रंगात दिली आहे.
– इंजेक्शनच्या बनावट पॅकेट्सवर स्पेलिंगमध्ये बर्याच चुका आहेत, जे काळजीपूर्वक वाचल्यास स्पष्ट होईल.
– वास्तविक रेमेडिसिव्हिर इंजेक्शनची काचेची कुपी खूप हलकी आहे. लक्षात ठेवा की या भयंकर करोनासंकटातही फसवणूक करायला मागेपुढे पाहत नाहीत, त्यामुळेच हे इंजेक्शन योग्य ठिकाणाहून योग्य किमतीत विकत घेणे आवश्यक आहे.