बारामती (प्रतिनिधी) : करोना वॅक्सिनसाठी आलेल्या फोन कॉलला कोणतीही माहिती देऊ नका अन्यथा तुमचे बँकेतील पैसे गायब होतील. याबाबत नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी केले आहे.
करोना वॅक्सिनसाठी आलेल्या फोन कॉलला कोणतीही माहिती देऊ नका, रजिस्ट्रेशनच्या नावाखाली तुमचा आधार कार्ड नंबर मागितला जाईल. त्यानंतर ओटीपी विचारला जाईल व तुमचे नाव रजिस्टर होईल असे सांगितले जाईल. पण चुकूनही ही सर्व माहिती सांगू नका. अन्यथा तुमचे बँक अकाऊंट सायबर चोरट्यांकडून रिकामे होईल.
करोना वॅक्सिनबाबत कोणतीही शंका असल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन माहिती घ्या. घाई करू नका. सावध राहा आणि काळजी घ्या. कोणीही आपल्या फायद्यासाठी आपल्याकडे येत नाही त्यामध्ये त्यांचा फायदा लपलेला असतो. त्यामुळे कोणीही अशा फसवणुकीला बळी पडू नका, असे आवाहन शिरगावकर यांनी केले आहे.