मुंबई – महाराष्ट्रात पुन्हा एकदा करोनाचे रूग्ण वाढायला सुरूवात झाली आहे. राज्यात दररोज सरासरी 5 ते 6 हजारांनी बाधित संख्या वाढू लागली आहे. दहा दिवसांपूर्वी हा आकडा दिवसाला हजाराच्या आसपास होता.
त्यात आता काळजीची बाब म्हणजे 10 वर्षापर्यंतच्या लहान मुलांमध्ये करोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास येते आहे. सध्या शाळा बंद असल्या तरी गर्दीच्या ठिकाणी जाणे, बाहेर खेळणे यामुळे लहान मुलांनाही लागण होत असल्याची भीती वर्तवली जाते आहे.
वर्षभरात 70 हजार मुलांना करोना झाला होता. मात्र आजच्या घडीला राज्यात 10 वर्षांखालील मुले बाधित होण्याचे प्रमाण 3.35 टक्के आहे. लहान मुलांमध्ये चांगली रोगप्रतिकार शक्ती असल्याने त्यांच्यात कोणतीही गंभीर लक्षणे दिसत नाहीत, पण ते करोनाचे वाहक बनतात असे तज्ञांचे म्हणणे आहे.