सावधान! करोनाचा ‘हा’ नवा व्हेरियंट सर्वाधिक घातक; 3 पैकी एकाचा होईल मृत्यू

ब्रिटनमधील वैज्ञानिकांच्या संशोधनातील माहिती

नवी दिल्ली : जगाला भेडसावणाऱ्या करोनाने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. कारण  करोनाचा विषाणू  सतत आपली रचना बदलत दररोज नवनवीन आव्हान  निर्माण करत आहे. त्यातच  करोनाचा पुढील व्हेरियंट सर्वाधिक घातक असल्याचा दावा ब्रिटनमधील वैज्ञानिकांनी  केला आहे.

संबंधित वैज्ञानिकांच्या दाव्यानुसार, करोना विषाणूच्या पुढील व्हेरियंटमुळे तीन पैकी एक जणाचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. सायंटिफिक अॅडव्हायझरी ग्रुप फॉर इमेरजन्सीने  याबाबतचा अहवाल प्रकाशित केला आहे. त्यामुळे जगभर चिंता वाढली आहे.

प्रकाशित केलेल्या संशोधन अहवालात अशी चेतावणी देण्यात आली आहे की, करोना विषाणूचा भविष्यात येणारा व्हेरियंट MERS व्हेरियंटपेक्षाही अधिक प्राणघातक असू शकतो. या व्हेरिअंटमुळे जगभरात मृत्यू दर जवळपास 35 टक्के इतका राहण्याची शक्यता आहे. या संशोधनात केलेल्या दाव्यानुसार, तीन पैकी एकाचा मृत्यू होणे अटळ आहे.

करोना विषाणूचा भविष्यात येणारा सर्वाधिक घातक व्हेरिअंट हा प्राण्यांपासून येण्याची शक्यता संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांच्या गटाने वर्तवली आहे. त्यामुळे करोना विषाणूचा पुढील व्हेरिअंट रोखायचा असेल तर सर्व प्राण्यांना मारावे लागेल, किंवा त्याचे व्यापक प्रमाणावर लसीकरण करावे लागेल, असे दोन उपाय सुचवण्यात आले आहे. करोना विषाणूचा नवीन व्हेरियंट जनावरांपासूनच पसरण्याची शक्यता अधिक असल्याचे संशोधकाचे म्हणणे आहे.  

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.