ईद साजरी करताना कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्या – भाजप खासदार  

बुलंदशहर – उत्तर प्रदेशतल्या बुलंदशहरमधील एका भाजप खासदाराने ईदच्याआधी मुस्लिमांना सल्ला दिला आहे. ईदचा उत्साह साजरा करताना कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन भाजप खासदार भोला सिंह यांनी केले आहे.

भोला सिंह म्हणाले कि, हिंदूसुद्धा होळी, दिवाळी आणि रक्षाबंधनसह इतर सण साजरे करतात. पण त्या सणांचा कोणालाही त्रास होत नाही. त्यांनी कोणत्याही धर्माच्या सणाला उल्लेख न करता सांगितलं की, तुमच्या श्रद्धेचे प्रदर्शन करण्यासाठी एक खास जागा दिलेली आहे. तुमच्या श्रद्धेच्या नावाखाली रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होता कामा नये. तरीही असं झाल्यास प्रशासन योग्य कारवाई करेल, असे त्यांनी सांगितले. भोला सिंह यांच्या यवक्तव्यावर सोशल मीडियातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.