वॉश्गिंटन : भारतात धुमाकूळ घालणारा करोनाचा डेल्टा व्हेरिएंट आता इतर देशांमध्येही वेगाने पसरत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याशिवाय अल्फा, बीटा व्हेरिएंटदेखील आहेत. अर्जेंटिना आणि चिलीमध्ये लांब्डा या व्हेरिएंट कहर करतआहे. धक्कादायक म्हणजे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांवर संकट निर्माण करत आहे.
आता येणाऱ्या काळात करोनाचा असा व्हेरिएंट येणार असून तो या सर्वांपेक्षा अधिक धोकादायक असणार आहे असा रिपोर्ट समोर आला आहे. एका रिपोर्टनुसार, अशा कुठल्याही व्हेरिएंटची अपेक्षा कमी आहे परंतु हे अशक्यदेखील नाही. करोनाचा असा व्हेरिएंट येण्याची शक्यता आहे. जो कोरोना लसीचा प्रभाव शून्य ठरवेल आणि जंगलातील आगीप्रमाणे व्हायरस पसरण्यासाठी कारणीभूत ठरेल असा दावा या रिपोर्टमधून तज्ज्ञांनी केला आहे.
भीती ही आहे की, हा व्हेरिएंट संक्रमित लोकांच्या जुन्या आकडेवारीचे सर्व रेकॉर्ड्स मोडून टाकेल. सिडार्स-सिनाई मेडिकल सेंटरमध्ये डायरेक्टर ऑफ मॉलिक्युलर पॅथोलॉजीचे संचालक एरिक वेल यांच्या म्हणण्याप्रमाणे, डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक संक्रमित व्हेरिएंट येणं कठीण आहे. कदाचित येणाऱ्या काळात असा व्हेरिएंट येऊ शकतो जो वेगाने लोकांना संक्रमित करेल. या नव्या व्हेरिएंटचे म्यूटेशनमुळे स्पाइक प्रोटीन बदललं तर कोरोना लसीचा प्रभाव नष्ट होईल. सर्वाधिक लसी स्पाइक प्रोटीनला टार्गेट करतात आणि व्हायरसला न्यूट्रलाइज करतात.
रिपोर्टमध्ये इशारा देण्यात आला आहे की, मोठ्या संख्येने लोकांनी लस घेण्यापासून नकार दिल्याने ते कोविड १९ म्यूटेशन लॅब बनतील. डेल्टा व्हेरिएंटचे संक्रमण पाहता आगामी काही महिन्यांमध्ये यापेक्षा धोकादायक व्हेरिएंट येऊ शकतो. यूनवर्सिटी ऑफ मिशिगनचे चीफ हेल्थ ऑफिसर आणि इन्फेक्शियस डिजीज रिसर्चर प्रीती मलानी यांनी सांगितले की, आता फक्त मास्क घालणं आणि सोशल डिस्टेंसिंगने कोरोना व्हायरसपासून बचाव करणं कठीण आहे. या समस्येवर लस समाधान आहे परंतु ती न घेणाऱ्यांमुळे एक मोठी बाधा उभी राहू शकते.