पॅरिस – फ्रांस मध्ये करोनाचा विळखा पुन्हा वाढू लागल्याची लक्षणे दिसू लागली असून त्या देशाच्या पंतप्रधानांनाही करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. फ्रांसचे पंतप्रधान जीन कास्टेक्स हे शेजारच्या बेल्जियमच्या दौऱ्यावर गेले होते.
तेथून ते परतआल्यानंतर त्यांना ही लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यांच्या एका मुलीलाही करोनाने ग्रासले आहे. फ्रांसच्या पंतप्रधानांच्या संगतीत आल्यामुळे बेल्जियमचे पंतप्रधान ऍलेक्झांडर डी क्रु यांनीही करोनाची चाचणी केली. विशेष म्हणजे त्यात तेही पॉझिटीव्ह आले आहेत.
फ्रांसमध्ये आत्ता पर्यंत 75 टक्के लोकांचे करोनाचे लसीकरण झाले आहे. पण गेल्या काही दिवसात करोनाच्या केसेसचे प्रमाण येथे लक्षणीयरित्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे करोना उपचार केंद्रांमध्ये दाखल होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत असून त्यातून मृत्यूचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रशासन पुन्हा धास्तावले आहे.